Petrol Diesel Price Today : आज रविवार असून आज सर्वांच्या सुट्टीचा दिवस आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख महानगरांमध्ये किमती सारख्याच राहिल्या आहेत, परंतु काही शहरांमध्ये मालवाहतूक आणि इतर कारणांमुळे किमतींमध्ये किंचित फरक दिसून आला आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 89.62 रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे.
मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि एक लीटर डिझेल 94.24 रुपयांना विकले जात आहे.
नोएडा-गुरुग्राममध्ये आज पेट्रोल-डिझेलचे दर बदलले आहेत
नोएडामध्ये पेट्रोल 97.00 रुपये आणि डिझेल 90.14 रुपये प्रति लिटर
गुरुग्राममध्ये पेट्रोल 96.89 रुपये आणि डिझेल 89.77 रुपये प्रति लिटर
जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर आहे
आग्रामध्ये पेट्रोल 96.63 रुपये आणि डिझेल 89.80 रुपये प्रति लिटर आहे
उदयपूरमध्ये पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 94.44 रुपये प्रति लिटर
कच्च्या तेलाची किंमत
गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत $1.47 किंवा 1.71 टक्क्यांनी वाढून $87.63 प्रति बॅरलवर पोहोचली आहे. WTI क्रूडची किंमत $1.03 किंवा 1.28 टक्क्यांनी वाढून $81.64 वर आहे.