PM Kisan : जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मोदी सरकार तुमच्यासाठी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
कारण आत्तापर्यंत तुमच्या बँक खात्यात वर्षाला 6000 रुपये येत आहेत. मात्र आता केंद्र सरकार आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पात PM-KISAN योजनेवर मोठी भेट देऊ शकते.
सर्वसाधारण अर्थसंकल्पात या योजनेअंतर्गत मिळणार्या वार्षिक 6000 रुपयांच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तात सूत्राच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार पीएम-किसान योजनेअंतर्गत वार्षिक रक्कम 8000 रुपयांपर्यंत वाढविली जाऊ शकते. ही वाढ एका वर्षासाठी असू शकते आणि त्यानंतर त्याचा आढावा घेतला जाईल. यामुळे सरकारवर 22,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
वार्षिक मर्यादा 6000 रुपये
फेब्रुवारी 2019 मध्ये सरकारने PM किसान सन्मान निधी PM-KISAN योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपये पाठवते आहेत.
योजनेच्या सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या 3 कोटींच्या जवळपास होती, ती आता 11 कोटींहून अधिक झाली आहे. मात्र, शेतकरी तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.