PM Kisan Yojna : जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अनेक दिवसांपासून वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार गुड न्युज देणार आहे.
कारण 13व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत. याबाबत सरकारने 13व्या हप्त्याची रिलीज तारीख जाहीर केली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/02/ahmednagarlive24-86431638-a468-4a5f-8265-ed1435136405.jpeg)
केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा नवीन हप्ता (13 वा हप्ता) जारी करतील.
सविस्तर जाणून घ्या
करंदलाजे म्हणाले की, सोमवार, 27 फेब्रुवारी रोजी बीएस येडियुरप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते हायटेक रेल्वे स्टेशनचे उद्घाटन होणार आहे. यानंतर ते किसान सन्मानचा नवीन हप्ता जारी करतील.
ऑक्टोबर 2022 मध्ये पंतप्रधानांनी दिल्लीतून शेतकऱ्यांच्या खात्यात 22,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता जारी केला होता. लाभार्थी शेतकऱ्यांच्या 14 कोटी खात्यांमध्ये आतापर्यंत 2.70 लाख कोटी रुपयांची रक्कम जारी करण्यात आली आहे.
अशाप्रकारे यादीत तुमचे नाव तपासा
1. सर्वप्रथम, तुम्ही PM KISAN च्या https://pmkisan.gov.in/ वेबसाइटला भेट देऊ शकता.
2. यानंतर स्क्रीनवर भारताच्या नकाशासह “डॅशबोर्ड” दिसेल. त्यावर क्लिक करा.
3. त्यानंतर तुमचे संबंधित राज्य, जिल्हा आणि गाव निवडा.
योजनेबद्दल माहिती आहे का?
पीएम-किसान अंतर्गत, सरकार गरीब शेतकर्यांना प्रति वर्ष ₹6,000 मिळतात. या अंतर्गत, ₹ 2,000 तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जातात. त्याची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी झाली, जेव्हा पहिला हप्ता भरला गेला. PM-KISAN चे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.