Maharashtra news : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रक वाटप सुरू केले आहे.
मात्र, मुंबईत याची सुरवात होताच, चेंबूर भागात पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना का ताब्यात घेतले आणि काय कारवाई केली जाणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.ठाकरे यांच्याकडून मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा पाठपुरावा केला जात आहे.
पुण्यात घोषणा केल्याप्रमाणे त्यांनी नागरिकांसाठी एक पत्र लिहिले असून ते घरोघरी वाटण्यात येणार आहे. त्याची सुरवात मुंबईत झाला. मात्र, सुरूवात करताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मुंबईच्या चेंबूर परिसरातील मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरुवात केली होती. चेंबूरमध्ये या पत्रकाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांनी या मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या या पवित्र्यामुळे राज्याच्या इतर भागांमध्येही मनसैनिक राज ठाकरे यांचे पत्रक वाटायाला गेल्यास त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.