संक्रातीला ठरणार नगर लोकसभेचा उमेदवार.

Published on -

अहमदनगर :- नगर लोकसभेचा उमेदवार फायनल करण्यासाठी आता १५ जानेवारीचा मुहूर्त मिळाला आहे,उद्या १५ जानेवारीला दिल्लीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या दोन्ही काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. नंदुरबार, नगर, औरंगाबाद या तीन जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरु असून चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत. काँग्रेच्या वाट्याला गेेलेली नंदुरबारच्या जागेसाठी राष्ट्रवादी इच्छूक आहे. अहमदनगरची राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा काँग्रेसला हवी आहे.

अहमदनगरच्या जागेवरुन दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी.

पुणे, यवतमाळ, रत्नागिरी या जागा काँग्रेसकडे राहणार आहेत. काँग्रेसच्या कोट्यातील औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. त्याठिकाणी सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. अहमदनगरच्या जागेवरुन दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी होणार आहेत.

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा विरोध.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अहमदनगरची जागा मागितली. मात्र अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट पवार यांची भेट घेत विखेंना विरोध केला आहे.

पवार यांनी नगरची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. राष्ट्रवादीच नगरची जागा लढविणार असल्याचे सांगितले आहे. 15 जानेवारीला दिल्लीत होणार्‍या बैठकीत ह्या जागेचा तिढा सुटण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe