Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच मध्य रेल्वेवर धावणाऱ्या सीएसएमटी-शिर्डी, सोलापूर, गोवा आणि नागपूर- बिलासपूर, नागपूर-इंदोर या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
१ ते १५ नोव्हेंबर या अवघ्या १५ दिवसांत ६८ हजार ७३६ प्रवाशांनी प्रवास केल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.
मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डीला सर्वाधिक पसंती
वंदे भारत प्रवासी
सीएसएमटी-शिर्डी ११,१८९
शिर्डी-सीएसएमटी ८८५४
सीएसएमटी-सोलापूर १३,३४०
सोलापूर-सीएसएमटी १३,३४०
नागपूर-बिलासपूर ६४९५
बिलासपूर-नागपूर ६५११
सीएसएमटी-मडगाव ६३८७
मडगाव-सीएसएमटी ६३२७
नागपूर-इंदोर ४७२०
इंदोर-नागपूर ४९१३
सेमी हायस्पीड अशा वंदे भारत ट्रेनला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आरामदायी, वेगवान आणि किफायतशीर प्रवासासाठी या ट्रेन ओळखल्या जात आहेत. रेल्वे मंत्रालयाने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली.
यामध्ये मध्य रेल्वेवर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात पहिल्या १५ दिवसांत म्हणजे १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत तब्बल ६८ हजार ७३६ प्रवाशांनी प्रवास केला.
त्यातून मध्य रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सर्वाधिक पसंती मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेनला मिळाली आहे.