सत्तासंघर्ष, आज सुनावणी होण्याची शक्यताही धुसर

Published on -

Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणीही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

आजच्या कामकाज पत्रिकेत या प्रकरणाचा समावेशच करण्यात आलेला नाही. काल एक न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

त्यामुळे ती आज होईल, असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात आजच्या यादीत या प्रकरणाचा समावेशच नाही. गेल्या तीन आठवड्यांत चौथ्यांदा लांबणीवर पडली आहे.

गेल्या २४ तासांत सत्तासंघर्षाची सुनावणी दुसऱ्यांदा ती पुढे ढकलण्यात आली. सरन्यायाधीश रमणा यांच्यासमोर आतापर्यंतची सुनावणी झालेली आहे आणि रमणा २६ तारखेला निवृत्त होतायेत.

जर उद्याही सुनावणी होणार नसेल तर रमणा यांच्या कारकीर्दीत ही सुनावणी होणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News