सातारा,महाबळेश्वर, कराड तालुक्यात पावसाची हजेरी ! पिकांना संजीवनी…

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News : परतीच्या मान्सूनने सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागाला चांगला, तर पूर्वेकडील भागाला काहीसा दिलासा दिला. पश्चिम भागातील सातारा, जावळी महाबळेश्वर, कराड तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली. यामुळे पिकांना संजीवनी मिळाली.

काही ठिकाणी पाऊसही बरसला. दरम्यान, जिल्ह्यात आजअखेर सरासरी ५६७ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्याची सरासरी ९१७.३ मिलिमीटर असून, त्या तुलनेत आजवर केवळ ६५.२ टक्केच पाऊस झाला आहे.

यंदा पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावल्याने जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. दीर्घकाळ पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जलसाठेही ८० टक्क्यांवर राहिले आहेत.

पूर्ण क्षमतेने धरणे भरली नसल्याने पाणी टंचाईची गंभीर स्थिती उदभवण्याची शक्यता आहे. अशा स्थिती परतीच्या मान्सूनच्या ढगानी आकाश व्यापले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

बुधवारी पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी दमदार हजेरी लावल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याच्या पश्मिचेकडील भागात चांगला पाऊस झाला आहे, तर दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा, उत्तर कोरेगाव या तालुक्यांतही काही प्रमाणात पाऊस झाला आहे.

काल २४ तासातील मिलिमीटरमधील पाऊस असा (कंसात आजअखेर ) : सातारा २४.१ (५७०), जावळी २८.६ (९८७), पाटण १०.६ (१०२५), कराड २३ (३२२), कोरेगाव २३ (२८९), खटाव १६ (२५४), माण ७.३ (२५०), फलटण ५.१ (१७०), खंडाळा १०.२ (१९५), वाई १६ (४२०), महाबळेश्वर २६.५ (२८८३). धरणांतील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तसेच पिकांना संजीवनी मिळण्यासाठी अजूनही पावसाची गरज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe