अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagar News :-जिल्हा पोलीस दलातील 14 पोलीस उपनिरीक्षकांची सहायक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाली आहे.
यामध्ये पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बाबुराव उर्फ विक्रम मिसाळ यांची पुणे शहर, पंकज शिंदे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नितीन खैरनार यांची ठाणे ग्रामीण, नितीन पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.

कृष्णा धायवाट यांची नांदेड परिक्षेत्र, विनोद जाधोर यांची विशेष सुरक्षा विभाग, सतीश शिरसाठ यांची मुंबई लोहमार्ग, राजेश घोलवे यांची मुंबई शहर, प्रकाश बोराडे यांची मुंबई शहर, संगीता गिरी यांची मुंबई शहर,
धीरज राऊत यांची मुंबई शहर, भरत नागरे यांची मुंबई शहर, धनराज जारवाल यांची लोहमार्ग मुंबई येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे.
राज्यातील 846 उपनिरीक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) यांनी मंगळवारी रात्री उशिरा काढले आहेत. उपनिरीक्षक पदावरून सहायक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.