Maharashtra News : पुणे मनपा हद्दीत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : पुणे शहराच्या हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली.

मुंबई आणि नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना मालमत्ता करातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुणे महानगरपालिका हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत द्यावी,

अशी मागणी धंगेकर यांनी विधानसभेत केली. रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला, तसेच कनिष्ठ मध्यम वर्ग हे प्रामुख्याने ५०० चौरस फुटांच्या घरांमध्ये राहतात. पुणे शहराची वाढ होत असताना अनेक उपनगरे, लगतची गावे समाविष्ट झाली आहेत.

यामध्ये छोट्या मिळकतींचे प्रमाण जास्त आहे. मिळकतकर माफ झाल्यास या वर्गाला त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे, असे मत धंगेकर यांनी सभागृहात व्यक्त केले. पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प १० हजार कोटी रुपयांचा आहे.

त्यामुळे मिळकतकरात सवलत दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नात विशेष फरक पडणार नाही. महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात गळती आहे. ही गळती रोखल्यास पुणे महापालिकेला हे सहज शक्य आहे, असे धंगेकर यांनी सभागृहाला सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe