Pune Metro News: आणखी किती दिवस लागणार पुणे मेट्रो सुरू व्हायला? ‘या’ कारणामुळे होत आहे उशीर, वाचा माहिती

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये मोठमोठ्या आयटी पार्क उभे राहत असून औद्योगिक दृष्टिकोनातून देखील पुण्याचा विकास मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अनेक भागातून

या ठिकाणी लोक कामधंद्यासाठी स्थलांतरित होत असल्यामुळे साहजिकच याचा पायाभूत सुविधांवर विपरीत परिणाम होतो व तसा तो वाहतुकीवर देखील पाहायला मिळतो.

जर आपण पुण्याचा विचार केला तर गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून वाहतुकीची समस्या या ठिकाणी भीषण झाली असून यावर उपाय म्हणून 2006 मध्ये बीआरटीची देखील सुरुवात करण्यात आली.

परंतु याला अपयश आल्यानंतर मुंबई मेट्रो प्रकल्पांच्या धरतीवर पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचा पर्याय सादर करण्यात आला. साधारणपणे 2012 मध्ये या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता मिळाली व 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महा मेट्रोचे भूमिपूजन केले गेले. यामध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो सेवा सुरू आहे.

या अंतर्गत महा मेट्रो प्रकल्पामध्ये आणखी तीन मार्गीका जोडण्यात येणार आहेत. यामध्ये गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर सिविल कोर्ट पर्यंत मेट्रो सुरु करण्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा आवश्यक आहेत

त्या संपूर्ण तयार असून तरीदेखील मेट्रो सुरू होण्याला उशीर लागत आहे कारण अजून देखील सीएमआरएस अर्थात मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अंतिम मान्यता दिलेली नाही.

या आहेत मेट्रो सुरू करण्यामागील प्रमुख समस्या

सध्या मेट्रोचे जे काही स्टेशन सुरू आहेत त्यांच्या आवश्यक सुरक्षा वरून देखील काही वाद निर्माण झाला असून हे प्रकरण कोर्टकचेरीत पोचलेली आहेत. तसेच सीओपीकडून देण्यात येणाऱ्या अहवालामध्ये देखिल काही त्रुटी तसेच बऱ्याच काही तक्रारी या पीएमओपर्यंत आणि सीएमआरएस पर्यंत पोहोचल्यामुळे देखील या मेट्रोच्या विस्तारित मार्गांना मान्यता देण्यासाठी विलंब होत आहे.

या सगळ्या त्रुटी आणि तक्रार यांच्या पार्श्वभूमीवर सी एम आर एस कडून या प्रकल्पामध्ये कुठल्याही प्रकारचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कमतरता राहू नये याकरिता खूप काळजीपूर्वक परीक्षण करण्यात आलेले आहे.

यामधील फुगेवाडी ते सिविल कोर्ट यादरम्यानचे परीक्षण पूर्ण झाले असून गरवारे कॉलेज व रुबी हॉल क्लिनिक दरम्यानची जी मार्ग आहे तिची प्राथमिक तपासणी सीएमआरएसच्या टीमकडून पूर्ण करण्यात आलेली आहे.

आता फक्त मार्गेका आणि स्टेशन्स यांची अंतिम तपासणी बाकी असून हे पाहणी पूर्ण झाल्यानंतर महा मेट्रोला पुढील टप्प्यातील सेवा सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

परंतु आता ही अंतिम पाहणी साठी सीएमआरएस कडून अंतिम तारीख निश्चित केली जात नसल्यामुळे या पावसाच्या कालावधीत तरी मेट्रो सुरु होईल का असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

या ठिकाणची कामे अजून देखील अपूर्णच

ज्या पद्धतीने सीएमआरएसच्या अंतिम पहाणीच्या दृष्टिकोनातून या सेवेला उशीर होत असताना अजून देखील या मेट्रो मार्गीकेवरील काही ठिकाणचे कामे अपूर्ण आहेत.

त्यामुळे या मार्गावरील सर्व स्टेशनवर प्रवाशांसाठी कमीत कमी एक प्रवेश मार्ग म्हणजेच बाहेर जाण्यासाठी आणि आत येण्यासाठी व्यवस्थित सुरू असेल याबद्दलची खबरदारी देखील घेतली जात आहे.

तसेच डेक्कन जिमखाना व छत्रपती संभाजी उद्यान या दोन स्टेशनवर आवश्यक असलेल्या प्रवेश मार्गाच्या कामांवर आता फायनल टच दिला जात आहे. वास्तविक पाहता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मेट्रोचे सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिलेल्या होत्या.

परंतु आता जून संपत आला तरी देखील कामे सुरूच आहेत. मेट्रोची सेवा प्रत्यक्षात सुरू केव्हा होणार बाबत कोणालाच काही सांगता येत नसून पुढील टप्प्यातील सेवा सुरू कधी होईल याबाबत फक्त नवीन डेडलाईन दिली जात आहे. त्यामुळे आता सामान्य पुणेकरांकडून मेट्रोला ट्रोल केले जात असून नेमकी मेट्रोची सेवा कधी सुरू होईल याबाबत विचारले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe