Pune News : पीएमपीमध्ये होणार मोठे बदल ! अजित पवारांनी सांगितला मोठा प्लॅन….

Published on -

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी लवकरच पीएमपीएमएलच्या ताफ्यात मोठी भर पडणार आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नातून दीड हजार बस गाड्या ताफ्यात समाविष्ट होणार असून, या पावलामुळे प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर सेवा मिळणार आहे.

ई-बस डेपोचे उद्घाटन आणि 

चऱ्होली बु. आणि माण येथील ई-बस डेपोचे उद्घाटन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी माण डेपोला ३० आणि चऱ्होली डेपोला ६० ई-बस उपलब्ध करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

अजित पवारांनी सांगितला मोठा प्लॅन….

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पीएमपीएमएलला २३० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, त्यातून ५०० सीएनजी बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून मिळणाऱ्या २५० कोटी रुपयांच्या निधीचा वापर करून आणखी ५०० सीएनजी बस विकत घेतल्या जातील. याशिवाय ५०० इलेक्ट्रिक बसही ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर ताफ्यात जोडल्या जाणार आहेत. यामुळे पीएमपीएमएलचा बस ताफा पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक होणार आहे.

हरित महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण पाऊल

ई-डेपोच्या स्थापनेमुळे ‘ग्रीन महाराष्ट्र’ या संकल्पनेला चालना मिळणार आहे. कमी प्रदूषण करणाऱ्या वाहतूक सेवांचा प्रसार वाढवून पर्यावरण रक्षणासाठी पावले उचलली जात आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारखी शहरे स्वच्छ, हरित आणि तंत्रज्ञानप्रधान बनविण्याच्या दिशेने ही एक महत्त्वाची वाटचाल आहे.

कामगारांच्या हितासाठी मोठे निर्णय

पीएमपीएमएलच्या कामगारांसाठीही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. २०१५ साली वर्षभरात २४० दिवस काम केलेल्या १,४६७ बदली कामगारांना नियमित करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आणखी १,७०० कामगारांना कायम करण्याचा निर्णय झाला. शिवाय सातव्या वेतन आयोगाची थकबाकी चार टप्प्यांमध्ये वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News