Pune Ring Road: पुणे रिंग रोडसाठी आणखी जमिनीची गरज! ‘या’ 32 गावातील जमीन रिंग रोडसाठी संपादित होणार… संपूर्ण यादी वाचा

Published on -

Pune Ring Road:- पुणे शहरांमध्ये जो काही वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या असलेला प्रकल्पांमध्ये पुणे रिंग रोड प्रकल्प हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प असून पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण असे पाऊल ठरणार आहे.

पुणे रिंग रोड प्रकल्प हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून आखण्यात आला आहे व या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन ही पुणे जिल्ह्यातील सहा तालुके जसे की मुळशी, मावळ, खेड, भोर, हवेली आणि पुरंदर या तालुक्यातील गावांमधून संपादित करण्यात आली आहे.

या सगळ्या जमीन संपादनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, एमएसआरडीसीचे सहसंचालक लक्ष्मी नारायण मिश्रा व संबंधित उपविभागीय अधिकारी यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये पुणे रिंग रोडच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेले सेवा रस्ते आणि इतर पूरक सोयी सुविधा उभारण्यासाठी आणखी जमिनीची आवश्यकता भासणार आहे व त्यामुळे राज्य सरकारकडे 32 नव्या गावांमधील अतिरिक्त जमिनीच्या भूसंपादनासाठी प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे व या 32 गावांमध्ये या रिंग रोडच्या पश्चिम भागातील 22 व पूर्व भागातील दहा गावांचा समावेश आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावावर आधारित अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. साधारणपणे पुढील पंधरा दिवसात प्रत्यक्ष संपादन पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या गावांमधून होईल जमिनीचे संपादन

या अतिरिक्त जमिनीच्या संपादनात पुरंदर तालुक्यातील चांबळी आणि हिवरे या गावांचा विशेष उल्लेख आहे. पूर्वी चांबळी गावातील जमीन संपादनास विरोध झाला होता, परंतु आता शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या मोबदल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी जमीन देण्यास तयारी दर्शवली आहे. याशिवाय, मावळ तालुक्यातील चांदखेड, उर्से, परंदवाडी, कासार आंबोली, मुळशीतील मुठे, घोटावडे, कातवडी, भोरमधील खोपी, हवेलीतील रहाटवडे, बहुली ही गावे देखील प्रस्तावात आहेत.

नानोली तर्फे आकुर्डी, वडगाव, सुदुंबरे यांसारखी गावे, तसेच हवेली तालुक्यातील लोणीकंद, बिवरी, कोरेगाव मूळ, बकोरी, वळती आणि पुरंदरमधील पवारवाडी, गराडे, दिवे, चांबळी, सोनोरी, थापेवाडी, हिवरे ही गावे देखील संपादनाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. खेड तालुक्यातील खालुंब्रे, कुरोळी, सोळे, निघोजे, धानोरे आणि भोरमधील शिवरे या गावांतील जमिनीही यामध्ये समाविष्ट आहेत.

पुणे रिंगरोड प्रकल्पाचे महत्त्व

पुणे रिंग रोड प्रकल्प शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या मार्गामुळे शहराच्या चारही बाजूंना वाहतूक प्रवाह सुरळीत करण्यास मदत होईल. शिवाय, हे प्रकल्प ग्रामीण आणि उपनगरातील भागांना मुख्य शहराशी अधिक सहज जोडतील, ज्यामुळे आर्थिक विकासालाही चालना मिळेल.

मात्र, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणे, योग्य मोबदला देणे आणि वेळेत निर्णय घेणे अत्यावश्यक आहे, याचे भान प्रशासन आणि महामंडळाने ठेवणे गरजेचे आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजित वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने झाली, तर पुणेकरांना आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना याचा दीर्घकालीन लाभ निश्चितच होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News