Pune Ring Road :- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या पुणे रिंगरोडच्या कामाला आता गती आली असून रिंगरोडचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग असून त्यातील पश्चिम भागातील भूसंपादन प्रक्रिया आता वेगात राबविण्यात येत आहे. पश्चिम भागातील जवळजवळ 12000 शेतकऱ्यांनी भूसंपादनाकरिता आवश्यक असलेल्या जमिनीला संमती दिली असून उर्वरित जमिनीला देखील लवकर शेतकऱ्यांकडून संमती मिळणार आहे.
पश्चिम भागाचा विचार केला तर या ठिकाणचा रिंग रोड हा 38 गावांमधून जात असून यामध्ये मावळ तालुक्यातील सहा, हवेली तालुक्यातील 11, भोर तालुक्यातील पाच गावांमधून जात आहे. या ठिकाणाच्या सगळी जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या तुलनेत मात्र पूर्व भागातील मोजणीला वेळ लागत आहे.
पूर्व भागातील मोजणीला लागत आहे वेळ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे रिंगरोडचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग करण्यात आले असून त्यातील पश्चिम भागातील रिंग रोड करिता जमिनीचे संपादन प्रक्रिया वेगात सुरू असून पूर्व भागातील जागेची मोजणी मात्र आता अंतिम टप्प्यात आहे. या पूर्व भागातील हवेली तालुक्यातील 48 गावांपैकी पुरंदर तालुक्यातील सात, हवेली तालुक्यातील तीन आणि भोर तालुक्यातील दोन अशा बारा गावांच्या मोजण्या अद्याप अपूर्ण आहेत.
त्यामुळे येत्या 31 ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे. पूर्व भागातील रिंग रोडची मोजणी पूर्ण होण्यास विलंब लागत असून त्यामधील प्रमुख कारण म्हणजे पुणे ते औरंगाबाद हा जो द्रुतगती महामार्ग आहे तो पुरंदर आणि हवेली या दोन तालुक्यांमधून जाणाऱ्या रिंग रोड मार्गावर ओव्हरलॅप होत आहे.
त्यामुळे एमएसआरडीसी आणि एनएचएआयने मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला व यामुळेच हवेली तालुक्यातील वळती या गावाजवळ हा रिंग रोड आणि महामार्ग एकमेकांना येऊन मिळतो व याच ठिकाणहून भोर तालुक्यातील शिवरे येथे मार्ग जोडला जात आहे. त्यामुळे या 31 किलोमीटर लांबीचा हा मार्ग पुणे रिंगरोड आणि पुणे ते औरंगाबाद महामार्गासाठी सामायिक करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे या भागातील मोजणीला विलंब होत आहे असे एमएसआरडीसी कडून सांगण्यात आले.
पूर्व भागातील बारा गावांची मोजणी आहे बाकी
जर आपण पूर्व भागातील विचार केला तर यामध्ये मावळ तालुक्यातील 11, खेड तालुक्यातील बारा, हवेली तालुक्यातील 15 आणि पुरंदर तालुक्यातील सात व भोर तालुक्यातील 48 गावांचा या भागात समावेश असून यातील मावळ आणि खेड तालुक्यातील गावाचे मोजणी झालेली आहे. तर हवेली तालुक्यातील तीन, पुरंदर तालुक्यातील सात आणि भोर तालुक्यातील एक अशा बारा गावांची मोजणी अद्याप बाकी असून 37 गावांची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे.
31 ऑगस्टपर्यंत उर्वरित मोजणी पूर्ण होईल असे देखील सांगण्यात येत आहे. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हवेली, भोर या तालुक्यांमधून रिंग रोडची केलेली आखणी आणि एनएचएआयच्या आखणीमध्ये रस्त्यांच्या रुंदीमध्ये बराच फरक होता. यामध्ये एनएचएनएआयने रस्त्याची रुंदी 100 मीटर ग्राह्य धरली होती तर एमएसआरडीसीने 90 मीटर एवढे रुंदी ग्राह्य धरली होती. परंतु यामध्ये एनएचएआयने ग्राह्य धरलेली रुंदी कायम ठेवण्यात आलेली आहे.