राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी, मुस्लिम संघटनांवर संशय

Published on -

Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधीचे एक पत्र नांदगावकर यांच्या कार्यालयात आले आहे

नांदगावकर यांनी हे पत्र गृहमंत्र्यांकडे दिले आहे.यासंबंधी नांदगावकर यांनी सांगितले की, ‘मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यामुळे मनसेच्या नेत्यांना मुस्लीम संघटनांकडून धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या कार्यालयात नुकतंच एक पत्र आलं आहे.

ज्यामध्ये मला आणि राज ठाकरेंना जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे धमकीचं पत्र मी गृहमंत्र्यांकडे दिलं आहे. त्यानंतर गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना याबाबत सूचना दिल्या आहेत,नांदगावकर पुढे म्हणाले, ‘राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटून उठेल.

राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली होती. मात्र सरकारने अद्याप पाऊल उचलेलं नाही. त्यामुळे केंद्र सरकारने तरी या मागणीचा विचार करावा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News