अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- भाजपचे नेते महाविकासआघाडी सरकार कधी कोसळणार याबाबत दररोज नवे दावे आणि मुहूर्त करत आहे. दरम्यान नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी सरकार बाबत एक महत्वाचे विधान केले आहे.(Raj Thackeray)
राज्यातील महाविकासआघाडी सरकार पडेल असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे, भाजपा यात मग्न आहे की आमचं सरकार येईल.
यामध्ये महाराष्ट्राला तुमची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण एक सक्षम व्यक्ती या तिन्ही सत्ताधाऱ्यांना कोणी दिसत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.
याबाबत तुम्ही काय विचार करत आहात का? आणि पुन्हा एकदा सक्षम पर्याय उभा करण्यासाठी तुम्ही काही करत आहात का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीकडून विचारण्यात आल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की,
“मी बाहेर पडलोय ना… आणि आताचे एकूण हे तिघाचे सरकार पाहता, हे काही आता पडेल असं सरकार वाटत नाही मला” असे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे हे सध्या औरांगाबाद दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरे करणार असल्याचे सांगितले जात आहे.
त्यानुसार राज ठाकरे यांनी दौरा सुरु केला आहे. काल ते नाशिक दौऱ्यावर होते. आज ते औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. निवडणुकांच्या तोंडावर हा दौरा आहे असा अर्थ कोणीही काढू नये. निवडणुकांना अद्याप बराचसा अवकाश आहे.
त्यातच ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका आणखी सात आठ महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. असे राज ठाकरे म्हणाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम