राज ठाकरे यांची पुढील सभा होणार या शहरात, तयारी सुरू

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra news : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच्या मालिकेतील पुढील सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात होणार आहे.

त्यासाठी तयारी सुरू झाली असून ठाकरे स्वत: उद्यापासून दोन दिवस पुण्यात येऊन याचे नियोजन करणार असल्याचे सांगण्यात आले.पुण्यात २१ ते २८ मे या काळात सभा घेण्याचे नियोजन असून त्यासाठी पोलिसांना परवानगीची मागणी करणारे पत्र पक्षातर्फे देण्यात आले आहे.

मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सभेसाठी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. २१ ते २८ मे या दरम्यान पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा घेण्याचे नियोजन आहे.

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण न होण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या सूचनेनुसार आम्ही सभेसाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे मैदान निवडले असल्याचे पत्रामध्ये म्हटले आहे. चर्चेतून नेमकी तारीख ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe