Rajinikanth : सध्या राज्याच्या राजकारण अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात कसे समीकरण असणार याबाबत अजूनही काही ठरले नाही. असे असताना दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
तसेच शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे. यामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे. रजनीकांत वानखेडे स्टेडिअममध्ये हजर होत त्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मॅच पाहिली आणि आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी आदित्य ठाकरे तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. रजनीकांत यांचे ठाकरे कुटुंबीयांशी कौटुंबिक नाते संबंध आहेत. त्यांच्यात कोणती चर्चा झाली हे अद्याप समोर आले नाही. यामुळे यावर अजून कोणाची प्रतिक्रिया आली नाही.
रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फार पूर्वीपासून चाहते आहेत. त्यामुळे ते मातोश्रीवर आले होते. तर त्यामुळे ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. आता येणाऱ्या काळात काही वेगळे चित्र दिसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळात नेत्यांच्या भेटीगाठी होणं यामध्ये काही वेगळे नाही. मात्र दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.