राणे बंधूंना शरद पवार यांच्याबद्दल केलेले विधान भोवणार; राष्ट्रवादी नेत्याने केला गुन्हा दाखल

Published on -

मुंबई : खासदार निलेश नारायण राणे (nilesh rane) भाजपाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी समजत तेढ निर्माण करेल असे भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शरद पवार यांचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊदशी संबंध असल्याचे वारंवार प्रसार माध्यमांमध्ये नितेश व निलेश राणे वक्तव्य करत आहेत. तसेच राणे बंधू यांनी अनिल देशमुख हिंदू आहेत, म्हणून त्यांचा राजीनामा घेतला आहे असे म्हटले आहे.

तर नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असे वक्तव्य राणे बंधू करत आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

याप्रकरणी शरद पवार यांचा दाऊदशी संबंध आहे, असे वक्तव्य़ करून शरद पवार याच्या जीवाला धोका निर्माण केला असल्याने राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल केला दाखल केला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांना यांसंदर्भातला पुराव्याचा पेनड्राव्ह दिला आहे.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून महविकास आघाडी आणि भाजप (Bjp) यांच्यात राजकीय वातावरण अधिक चिघळत भाजपकडून भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीकडून केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा वापर करून आम्हाला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe