Ranjitsinh Disley : अनेक वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले हे अमेरिकेत जाऊन परत आले आहेत. ते अमेरिकेत जाण्याआधी बराच गोंधळ झाला होता. आता ते सोलापूर जिल्हा परिषद शाळेत ड्युटीवर रुजू झाले आहेत.
असे असताना डिसले गुरुजींनी अमेरिकेत जाऊन आल्यापासून कोणताही अहवाल दिला नाही. मात्र, ते ड्युटीवर हजर आहेत. दरम्यान, अमेरिकेत जाऊन काय शिक्षण घेतले, विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होईल याबाबत जिल्हा परिषदेला काहीही माहिती नसल्याचं शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी सांगितले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/03/ahmednagarlive24-Capture-227.jpg)
आम्ही आगामी जून या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना यांचा लाभ देण्याचा प्रयत्न करू असेही जावीर यांनी सांगितले आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारची प्रतिष्ठीत फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. या स्कॉलरशिपद्वारे ते सहा महिने अमेरिकेत राहून संशोधन करणार होते. यासाठी डिसले यांनी सहा महिन्यांची रजा घेतली होती. या रजेसाठी मोठा वाद निर्माण झाला होता.
असे असताना आत ते साडेतीन महिन्यांत ड्युटीवर रुजू झाले असल्याची माहिती सोलापूर शिक्षण विभागाने दिली आहे. माढा तालुक्यातील परीतेवाडी या जिल्हा परिषद शाळेत रुजू झाले आहेत.