रेशन कार्डधारकांनो सावधान! 31 मे पर्यंत पुरावे नाही दिले तर कार्ड होणार रद्द, नेमके काय लागणार पुरावे वाचा सविस्तर!

राज्यात बोगस रेशन कार्डसाठी ३१ मेपर्यंत तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. योग्य पुरावे न दिल्यास कार्ड रद्द होणार आहे.

Published on -

राज्यातील बोगस रेशन कार्डांचा पर्दाफाश करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ३१ मे २०२५ पर्यंत ही मोहीम राबवली जाणार असून, यामध्ये योग्य पुरावे न सादर करणाऱ्या कार्डधारकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे.

तपासणीची प्रक्रिया

राज्यातील प्रत्येक रेशन कार्डाची छाननी करण्यात येणार आहे. यासाठी रेशन दुकानांमध्ये तपासणी नमुना फॉर्म मोफत दिला जाणार आहे. हा फॉर्म भरून कार्डधारकाने हमीपत्रासह दुकानदाराकडे सादर करावा लागेल, आणि त्याबदल्यात ग्राहकाला पोचपावती दिली जाईल.

कार्डांचे वर्गीकरण

‘अ’ यादी – ज्यांनी योग्य कागदपत्रांसह पुरावे सादर केले आहेत. त्यांचे रेशन कार्ड संबंधित वर्गवारीत (जसे अंत्योदय, प्राधान्य कुटुंब) कायम ठेवण्यात येणार आहे.

‘ब’ यादी – ज्या कार्डधारकांकडे आवश्यक पुरावे नाहीत. त्यांना १५ दिवसांत वास्तव्याचा पुरावा व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात येणार आहे.

जर पहिल्या १५ दिवसांत पुरावे सादर झाले नाहीत, तर अजून १५ दिवसांची मुदत दिली जाईल. त्या कालावधीतही पुरावे न दिल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे.

कोणते पुरावे द्यावे लागणार?

वास्तव्य सिद्ध करणाऱ्या किमान एक पुराव्याची आवश्यकता असेल. यामध्ये पुढीलपैकी कोणताही एक दस्तऐवज सादर करता येईल

भाडेकरार/भाडेपावती, घरमालकीचा पुरावा, गॅस जोडणी पावती, बँक पासबुक, वीज बिल, टेलिफोन/मोबाईल बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, कार्यालयीन ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड

घरगुती भेटीद्वारे तपासणी

या मोहिमेअंतर्गत कार्डधारकांच्या घरी भेटी देण्यात येणार असून वास्तव्याची खातरजमा केली जाईल. त्यामुळे खोटे रेशन कार्ड ठेवणाऱ्यांना या मोहिमेमुळे अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

गरजूंना लाभ

ही मोहीम गरजूंना रेशनचा योग्य लाभ मिळावा आणि बनावट कार्डांमुळे होणारा अन्नधान्याचा अपव्यय थांबवावा, यासाठी राबवण्यात येत आहे.तो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe