Ravikant Tupkar : शेतकऱ्यासाठी मला भगतसिंग व्हायचंय, फासावर जायचंय, रविकांत तुपकर यांचे मोठे वक्तव्य

Published on -

Ravikant Tupkar : कापूस आणि सोयाबिनला चांगला भाव मिळावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकर यांच्यावर पोलिसांनी लाठी चार्ज केला. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर रविकांत तुपकर यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

ते म्हणाले, या रविकांत तुपकरला हजार वेळा जरी तुरूंगात टाकलं तरी आंदोलन थांबणार नाही, शेतकऱ्यांसाठी कितीही वेळा तुरुंगात जायला तयार आहे. शेतकऱ्यासाठी मला भगतसिंग व्हायचंय, मला फासावर जायचंय, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सहा दिवसांनंतर अकोला कारागृहातून जामिनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची सुटका झाली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. अकोला कारागृहातून सुटका झाल्यानंतर ते थेट बुलढाण्यातील शेगाव येथील संत गजानन महाराजांकडे दर्शनासाठी दाखल झाले.

संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन अशी प्रार्थना करणार की, राज्यातील राज्यकर्त्यांना सद्बुद्धी मिळो. बळीराजा सुखी होऊ देत यासाठीही गजानन महाराजांना साखडं घालणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe