शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलनाबाबत राज्यपालांकडून प्रतिक्रिया; म्हणाले, या घटनेला कोणीही…

Content Team
Published:

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर काल एसटी कर्मचाऱ्यांचे (ST staff) आक्रमकपणे आंदोलन केले आहे, त्यामुळे या घटनेचा राष्ट्रवादीकडून (Ncp) संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपवर (Bjp) हल्लाबोल केला आहे, तसेच या घटनेनंतर विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राज्यपाल?

पवारांच्या घराबाहेर आंदोलनाबाबत बोलताना राज्यपाल म्हणाले, मुख्यमंत्री या विषयाला हाताळत आहेत, ते समजदार व्यक्ती आहेत. स्वतः शरद पवार मोठे आणि प्रतिष्ठित नेते आहेत.

अशा प्रकारची घटनेला कोणीही योग्य म्हणणार नाही. त्यामुळे अशा घटना होऊ नये यासाठी सरकार लक्ष देईल. अशी प्रतिक्रिया रारज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या अमरावतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या अमरावतीत पोलीस सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe