संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस

Published on -

३ जानेवारी २०२५ बीड : मस्साजोग (ता. केज) येथील संतोष देशमुख हत्याकांडातील फरार तीन आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवून योग्य बक्षीस देण्याचे पोलीस प्रशासनाने जाहीर केले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निघृणपणे हत्या केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती.या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. मात्र मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत.प्रयत्न करून सुद्धा ते तिघे तपास यंत्रणेला गुंगारा देत असल्याने त्यांना पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलीस दलातर्फे सुरु आहेत.

या तीन आरोपींच्या ठावठिकाणाची कोणास माहिती किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास त्यांनी आरोपींची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव अत्यंत गोपनिय ठेवण्यात येईल व त्याला योग्य ते बक्षिस देण्यात येईल असे आवाहन पोलिसांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!