अभी तो असली लढाई मुंबई में होगी, तयारीला लागा.. देवेंद्र फडणवीसांचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुंबईला (Mumbai) भ्रष्टाचारातुन बाहेर काढण्यासाठी कंबर कसली आहे. आणि त्यांनी कार्यकर्त्यांना तसे आदेशही दिले आहेत.

नुकतेच ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) भाजपने (Bjp) विक्रमी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप पक्षाचा जोर आता वाढला असून आता मुंबईवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण आखले आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, कोणत्याही लढाईने होरपळून जाऊ नका. विजयाने हुरळून जायचं नाही, विजयाने नम्र व्हायचं आहे. विजयाने अधिक मेहनत करायची आहे. अभी तो असली लढाई मुंबई में होगी.

आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत.

जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून या मुंबईला बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा. उद्यापासून कामाला लागा.

पुन्हा एकदा मुंबईत प्रचंड विजय आणि भाजपचं महाराष्ट्रात (Maharashatra) पूर्ण बहुमताचं सरकार बनविण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी भाजप यावेळी कार्यकर्त्यांना दिला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. तसेच मोदी है तो मुमकीन है, असे सूचक विधानही त्यांनी बोलताना केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe