Road theft : खेड्यात दळणवळणासाठी रस्ते एक महत्वाचा विषय आहे. रस्ते जर चांगले असतील तर त्याठिकाणी अनेक गोष्टींना वाव मिळतो. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते केले जातात. अनेक ठिकाणी रस्ते होतात पण काही ठिकाणी रस्ते होत नसतांना बीलं काढली जातात.
आता नाशिक जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडे याबाबत तक्रारी येऊ लागल्या आहेत. बांधकाम विभागाने याबाबत चौकशी सुरू केली आहे. यामुळे याची राज्यात चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात रस्ता चोरीला गेला आहे.

हे ऐकायला जरी वेगळे वाटत असले तरी शोधून देणाऱ्याला बक्षीस दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार चर्चेत आला होता. मालेगावमधील सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी रस्त्याची तक्रार करत रस्ता शोधून देणाऱ्याला लाखों रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
यामुळे विहिरी देखील चोरीला गेल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या आहेत. आता रोडबाबत देखील तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्यभर मालेगावच्या रस्त्याच्या चर्चा झाली होती. गावात रस्ताच झालेला नसतांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेला रस्ता प्रत्यक्षात नाही. यामुळे कामाचे पैसे गेले कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाची थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेतली आहे. यामुळे आता रोडबाबत चौकशी केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चौकशी सगळे प्रकरण समोर येणार आहे. त्यामुळे रस्त्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.