Ration Card : रेशन कार्ड संबंधात एक महत्वपूर्ण बातमी आली आहे. जर तुम्हीही मोफत रेशन घेत असाल तर तुमच्यासाठी ही धक्का देणारी बातमी ठरू शकते. मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे.
आम्ही लाखो लोकांना मोफत रेशन देणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. याची कारणे देखील सरकारने दिली आहेत. मोफत शिधावाटप योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व अपात्र शिधापत्रिकाधारकांना या योजनेतून तात्काळ वगळण्यात येईल,

असे सरकारने म्हटले आहे. गरीब आणि गरजूंसाठी मोफत रेशन उपलब्ध आहे, सर्व घटकांसाठी नाही. सध्या सरकारने असे लाखो लोक सिलेक्ट केले आहेत की ज्यांना मोफत रेशनचा लाभ मिळणार नाही.
* 10 लाख अपात्र कार्डधारकांची नावे समोर
एकट्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सुमारे 10 लाख अपात्र कार्डधारकांची नावे समोर आली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जे अपात्र आहेत आणि तरीही मोफत रेशनचा लाभ घेत आहेत अशा सर्वांचे रेशन कार्ड सरकार रद्द करणार आहे. देशभरात त्याची चौकशी सुरू आहे.
* मोफत रेशन कोणाला मिळणार नाही?
NFSA कडून मिळालेल्या माहितीनुसार, आयकर किंवा इतर कोणताही भरणा करणारा कोणताही कार्डधारक मोफत रेशनसाठी पात्र नाही. या सर्व लोकांना मोफत रेशन सुविधेचा लाभ मिळणार नाही. सरकारी आकडेवारीनुसार ज्यांच्याकडे 10 बिघापेक्षा जास्त जमीन आहे, त्यांना मोफत रेशनचा लाभ मिळणार नाही.
* रेशन कार्ड रद्द होणार
याशिवाय जे लोक चांगले व्यवसाय चालवत आहेत व वर्षाला तीन लाखरुपयांहून अधिक कमाई करत आहेत या लोकांना सरकारी रेशनचा लाभ मिळणार नाही. मोफत रेशन सुविधा घेणाऱ्या सर्व अपात्र शिधापत्रिकाधारकांचे कार्ड रद्द करण्याची तयारी सुरू आहे.
* कोरोनाच्या काळात सुरू झाली होती सुविधा
कोरोना काळात सरकारने गरिबांच्या मदतीसाठी मोफत रेशन सुविधा सुरू केली. कोणीही उपाशी राहू नये यासाठी शासनाने मोफत रेशन सुविधा सुरू केली होती. देशभरातील सुमारे 80 कोटी लोक मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत आहेत. सध्या सरकारने मोफत रेशनची तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवली असली तरी ती आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे.