प्रत्येक महाविद्यालयात सेतू केंद्र – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : आजचा युवक उपक्रमशील आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या बदलत्या गोष्टी तो जलदपणे आत्मसात करतो. संगमनेर महसूल विभाग आणि महाविद्यालयानी एकत्र येवून राबवलेलला युवा ही दुवा उपक्रम लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त ठरणार असून युवकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी यापुढे प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र चालविण्याचे धोरण आणणार आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

महसूल विभागाच्या वतीने संगमनेर महाविद्यालयात आयोजित ‘युवा ही दुवा’ या राज्यस्तरीय उपक्रमाचे उद्घाटन काल बुधवारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या उपक्रमशीलता वाव देण्याबरोबरच त्यांना कमवा व शिकाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची सोय व्हावी. यासाठी महाविद्यालय, दिव्यांग, एकल महिलांना यापुढे सेतू केंद्र देण्याचे शासनाने धोरण आहे.

प्रत्येक वर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो. या वर्षी महसूल दिनी महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. यात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ ह्या स्तुत्य उपक्रमात हजारो प्रकरणे निकाली काढून राज्यात हजारो सैनिकांना न्याय देण्यात आला.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले,महसूल सप्ताहात युवा संवाद आयोजित करण्यात आला. जिल्ह्यात १०७ महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. जिल्ह्यातील ३८ महाविद्यालयांसोबत मतदार जागृती करण्याचे काम करण्यात येत आहे.

शासनाचे विभाग आता कालानुरूप तंत्रज्ञानस्नेही होत आहेत. ऑनलाईन सेवा देण्याचे काम करत आहेत. शासनाप्रती संवेदना निर्माण करण्याचे काम विद्यार्थ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विद्याथ्यांच्या कौशल्याचा योजनांचा प्रचार-प्रसार करण्यात येईल.

उद्योजक संजय मालपाणी म्हणाले, युवकांचा समाजाशी संवाद होणे गरजेचे आहे. महसूल खाते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत पोहचणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेली विद्याथ्यांनी सायली मांडे हिने मनोगत व्यक्त केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सावली मांडे, प्रमोद गांजवे, ऋत्विक खासे, संदीप गोसावी यशवर्धन कासार, श्रेयस मांडेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार धीरज मांजरे यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe