आता गोव्याला जायला 18 नाही तर लागतील 8 तास! राज्यातील सर्वात लांबीचा ‘हा’ Expressway ठरेल गेमचेंजर

महाराष्ट्रातील नागपूर आणि गोवा यांना जोडणारा नवीन द्रुतगती मार्ग लवकरच सुरू होणार आहे.ज्यामुळे प्रवास आणखी वेगवान आणि सोयीस्कर होईल. या मार्गाचे नाव "नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग" असे आहे. हा महामार्ग ८०२ किलोमीटर लांबीचा असून त्याला सहा लेन कॉरिडॉर आहे.

Published on -

Shaktipeeth Expressway:- महाराष्ट्रातील नागपूर आणि गोवा यांना जोडणारा नवीन द्रुतगती मार्ग लवकरच सुरू होणार आहे.ज्यामुळे प्रवास आणखी वेगवान आणि सोयीस्कर होईल. या मार्गाचे नाव “नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग” असे आहे. हा महामार्ग ८०२ किलोमीटर लांबीचा असून त्याला सहा लेन कॉरिडॉर आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एमएसआरडीसीवर या महामार्गाची जबाबदारी आहे.या मार्गामुळे नागपूर आणि गोवा यांच्यातील प्रवासाची वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्या १८ ते २० तासांमध्ये हा प्रवास होतो. परंतु या नवीन द्रुतगती मार्गामुळे तो फक्त ८ ते १० तासांवर येईल. यामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगालाही प्रोत्साहन मिळेल.

महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधून जाईल

या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ८६,००० कोटी रुपये असून हा महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जाईल. यामुळे प्रादेशिक विकासाला चालना मिळेल. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणारा हा मार्ग महाराष्ट्र-गोवा सीमेजवळील पत्रादेवी येथे संपेल.

या मार्गावर वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, सिंधुदुर्ग यांसारख्या महत्त्वपूर्ण जिल्ह्यांचा समावेश असेल. त्यामुळे या भागांतील आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी एक नवा मार्ग खुला होईल.

महत्वाची तीर्थक्षेत्र जोडले जातील

शक्तीपीठ एक्स्प्रेसवेचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे त्यामध्ये प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश होईल. या मार्गामुळे वर्धा ते सिंधुदुर्गापर्यंत तीर्थयात्रेच्या दृष्टीने प्रवास सोयीस्कर होईल. विशेषतः, तुळजापूर, महालक्ष्मी (कोल्हापूर) आणि पत्रादेवी या धार्मिक स्थळांचा समावेश होईल. यामुळे भाविक आणि पर्यटकांना तीर्थयात्रा सोपी होईल आणि धार्मिक पर्यटनाला मोठा झटका मिळेल.

ग्रामीण भागाचा होईल विकास

ग्रामीण भागावरही याचा सकारात्मक परिणाम होईल. या मार्गावर अनेक छोटे-छोटे गावे, जसे सांगवडे, हलसवडे, नेर्ली, कणेरीवाडी इत्यादी येतात. या गावी द्रुतगती मार्ग होण्यामुळे त्या भागात आर्थिक संधी आणि विकासाची गती वाढेल.

नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा भारतातील सर्वात लांब महामार्गांपैकी एक ठरेल. ७०१ किमी लांबीचा हा मार्ग नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गापेक्षाही लांब असेल. या प्रकल्पामुळे लाखो लोकांचे जीवनमान उंचावेल आणि विविध जिल्ह्यांमध्ये वाहतूक सुलभ होईल. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा महामार्ग एक मोठा टर्निंग पॉइंट ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!