Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक जुनी आठवण सांगितली आहे. काल जागतिक महिला दिन होता. महिला दिनानिमित्त राज्य महिला आयोगाने कार्यक्रमाच आयोजन करण्यात केले होते. यामध्ये शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक जुनी आठवण सांगितली.
शरद पवार म्हणाले, माझ्या मातोश्री स्वातंत्र्य चळवळीत होत्या. यावेळी जिल्हा परिषद नव्हते, जिल्हा लोकल बोर्ड होतं आणि जिल्ह्यातून एक भगिनी त्या लोकल बोर्डावर जायची. तेव्हा पुणे जिल्ह्यातून माझ्या मातोश्री लोकल बोर्डावर गेलेल्या असायच्या.
त्या लोकल बोर्डाच्या बैठकीत कधीही उशिरा जायच्या नाहीत आणि कधीही गैरहजर राहायचा नाहीत. अशी त्यांची ओळख होती. त्यावेळी त्यांनी एका मुलाला जन्म दिला आणि तिसऱ्या दिवशी लोकल बोर्डाची मीटिंग होती. तेव्हा मिटिंग हुकणार असे वाटत असताना तिसऱ्या दिवशी त्या पुण्याला हजर झाल्या.
तेव्हा बारामती आणि पुण्याला एसटीची सर्व्हिस नसायची. खाजगी बसेस असायच्या. त्या बसेसमधून तीन दिवसांचं बालक घेऊन त्या मिटींगला हजर राहिलेल्या होत्या आणि ते तीन दिवसाचा बालक म्हणजे मी होतो, असेही शरद पवार यांनी सांगितले.
तसेच ते म्हणाले मी अनेकदा सांगतो की, विधानसभेत, लोकसभेत कुठे जायला संधी मिळाली की, कौतुक होतं. पण माझ्या आईने मला तिसऱ्या दिवशीच सभागृह दाखवले होते. असे म्हणतात एकच टाळ्या झाल्या. या कार्यक्रमात शरद पवार यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.