Sharad Pawar : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात, रात्री अकरा वाजता भेट घेऊन लावला निकाल…

Published on -

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एमपीएससी परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांचे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल स्वत: शरद पवार यांनी घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे.

रात्री बारा वाजता शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसाठी चर्चा केली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आयोगाने काही बदल केलेला आहे, असं पत्र मला काल मिळालं. हे पत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सी. जी. पाटील यांनी लिहिलं आहे.

या पत्रात विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आपण स्वत: उपस्थित राहून मार्ग काढावं, असं पत्रात म्हटलं आहे, यामुळे मी स्वतः बैठकीला उपस्थित राहील असेही पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एमपीएससीचे नवीन अभ्यासक्रम हे 2025 सालापासून लागू करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांची आहे. तुमचा प्रश्न मार्गी लागणार, असं आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले. शरद पवार यांच्या या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष सुरु केला

मी इथे येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यांचं म्हणणं असं आहे की, तुमचे प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचे कुलगुरु आणि आयोगाचे प्रतिनिधी यांच्यासोबत दोन दिवसात बैठक घेण्यास तयार आहेत, मी जबाबदारी घेतो, असेही पवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe