शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर संस्थांतर्गत झालेल्या विज्ञान प्रदर्शन तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत शिरुरच्या विद्याधाम प्रशालेने विजेतेपद तर क्रीडास्पर्धेत उपविजेतेपद पटकावले . विज्ञान प्रदर्शनात लहान गट ( ५ वी ते ७ वी ) – प्रथम – सोहम शिरसाट , प्रणव ढोले ,मोठा गट ( ८ वी ते १० ) – प्रथम – आदित्य शेळके , स्वराज तांबे , द्वितीय – समर्थ सोनलकर , पियुष उबाळे तृतीय – संग्राम इरोळे .
( ११ वी १२ वी गट ) – यश वाखारे , गौरव पाचर्णे यांनी बक्षीसे पटकावली . प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोठ्या गटात हर्षवर्धन काकडे , शर्वरी निचित , प्रणाली दरवडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर कॉलेज गटात सुरज उकीरडे , तेजस कदम , सिद्धेश तट्टू यांनी द्वितीय क्रमांक मिळवला .
तसेच या कामगिरीमुळे प्रशालेस चाम्पियन स्कुल ट्राॅफीचा मान मिळाला.
विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक संदीप करंजुले,जयश्री गवंड, रेखा विधाटे,मंगल भालेकर, संदीप खटके,प्रशांत साकोरे,सीमा गवळी,अमित पाटील, युवराज विराट, दिलीप पालापुरे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
तसेच क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष मुली व मुलांच्या कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक मिळवला . तसेच वैयक्तिक स्पर्धेत धावणे,लांबउडी,गोळाफेक, थाळीफेक यामध्ये ६ सुवर्ण , १२ रौप्य ५ कांस्य अशी एकूण २३ पदके पटकावली . या कामगिरीच्या जोरावर क्रीडा स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले.
या विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख सचिन रासकर, क्रीडा स्पर्धा प्रमुख बारकू येवले,भास्कर करंजुले,मच्छिंद्र बनकर,संतोषकुमार देंडगे,हरी पवार, संदीप तानवडे,कल्पना भोगावडे, कल्पना फराटे,पूनम पवार यांनी मार्गदर्शन केले.
तसेच शिक्षकांच्या झालेल्या क्रिकेट स्पर्धेत विद्याधाम ज्युनिअर कॉलेज संघ उपविजेता ठरला त्यामध्ये दत्ता पवार,कृष्णा फराटे,विजय खेडकर आदि खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम प्राचार्य प्रकाश कल्याणकर,उपप्राचार्य संजय शेळके,पर्यवेक्षक बाबुराव कोकाटे, गुरूदत्त पाचर्णे, शिवाजी पर्बत यांनी अभिनंदन केले.