Shivaji Kardile : काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले.
यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का बसला. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले. यामुळे आता बँकेवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. अनेक दिवसांपासून याठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/03/ahmednagarlive24-Capture-116.jpg)
असे असताना आता बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी आज अध्यक्ष पदाचा पदभार घेतला. पदभार घेताच त्यांनी मोठी घोषणा केली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते म्हणाले, बँकेत लवकरच सातशे कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, अशी घोषणा कर्डिलेंनी केली.
ते म्हणाले, जेव्हा मी बँकेचा अध्यक्ष नव्हतो. तेव्हाही सर्वांची कामं मी करत होतो. त्यामुळे आता मला अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे, असे म्हणत जिल्हा बँकेत लवकरच सातशे कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. यामुळे तरुणांना ही एक मोठी संधी मिळाली आहे.
दरम्यान, भाजपने यासाठी त्यांनी मोठी शक्ती पणाला लावली होती. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे. काही दिवसांपूर्वी बँकेचे अध्यक्ष व युवा नेते अॅड. उदय शेळके यांना अध्यक्ष करण्यात आले होते. परंतु दुदैवाने प्रदीर्घ आजाराने उदय शेळके यांचे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. यासाठी राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अध्यक्षपद मिळण्यासाठी तयारी केली होती.
बँकेच्या २१ संचालकांपैकी राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे चार, भाजपचे सहा व एक शिवसेना असे पक्षीय संचालक आहेत. यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद येईल, असे वाटत असताना हा एक मोठा धक्का मानला जात आहे.