Shivsena Bhavan : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. सध्या शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. यामुळे ते अडचणीत आले आहेत. आता त्यांच्यापुढे अजून एक मोठे टेन्शन पुढे आले आहे.
आता ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता सेना भवन देखील हातातून जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते योगेश देशपांडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

यामध्ये एखाद्या ट्रस्टची जागा शिवसेना भवनाला कशी दिली? असा प्रश्न त्यांनी तक्रारीत उपस्थित केला. योगेश देशपांडे यांनी शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टच्या विरोधात तक्रार केली आहे. यामुळे आता काय होणार हे बघणे महत्त्वाच ठरणार आहे.
दरम्यान, आम्ही सेना भवनावर दावा करणार नाही, असे शिंदे गटाकडून सांगितले गेले असले तरी येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना भवनाची जागा ही शिवसेनेची नसून शिवाई ट्रस्टची आहे.
या संदर्भात अधिक माहिती घेऊन तक्रार दाखल केली आहे. कारण पब्लिक ट्रस्ट जागा रेंट आऊट करु शकत नाही, अशी माहिती देशपांडे यांनी दिली आहे. ट्रस्टच्या जागेमध्ये कुठल्याही राजकीय उपक्रम राबवता येत नाही, असे असताना इतक्या वर्षांपासून तिथे राजकीय उपक्रम सुरु आहेत.