धक्कादायक ! कॅप्सूल टँकर मधून ‘या’ ठिकाणी गॅस चोरी, ३ जणांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  तुम्हाला आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या चोऱ्या झालेल्या माहिती असतील. पण पुण्यामध्ये थेट कॅप्सूल टँकर मधून गॅस चोरी करण्याची घटना समोर आली आहे.

याआधी घरगुती वापराच्या सिलेंडर मधून गॅस चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. चाकणमध्ये कॅप्सूल टँकर मधून गॅस चोरी होत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली होती.

पिंपरी चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅस चोरी करताना ३ जणांना ताब्यात घेतेले आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांच्याकडून १ कोटी १० लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. अमोल गोविंद मुंडे (वय २८,रा. बीड),

नरसिंग दत्तू फड (वय ३१,रा. बीड), राजू बबन चव्हाण (वय ५२, रा.रासे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत.

खेड तालुक्यातील रासे येथे कॅप्सूल टँकरमधून गॅस चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. सामाजिक सुरक्षा पथकाला धोकादायक पद्धतीने कॅप्सूल टँकर मधून गॅस चोरी करताना आरोपी आढळून आले. अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.