अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- बहिणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर भावाने स्वतःच्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला तसेच त्याने स्वतः देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
हि खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना असे टोकाचे पाऊल उचले आहे.

माया सोपान सातव (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. तर वैशाली समीर तावरे (वय ३०) असे हत्या केलेल्या बायकोचे नाव आहे. तर समीर भिवाजी तावरे (वय ४२) असे आरोपी पतीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील जुनामळा येथे समीर तावरे, पत्नी वैशाली तावरे आणि समीरची बहिण माया तावरे एकत्र राहत होते. माया हीच्या पतीचे निधन झाल्याने काही दिवसांपासून ती समीर सोबत राहायला होती. माया आणि वैशालीचा घरगुती कारणावरून वाद होते.
मात्र, हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात माया रात्री घर सोडून गेली. समीर तसेच त्याच्या कुटुंबीयांनी गुरुवारी सकाळी मायाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
तिने त्यांच्या शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे कळले.पत्नीच्या त्रासाने बहिणीने आत्महत्या केल्याने पतीचा राग अनावर झाला.
त्याने घर गाठत पत्नी विशाखाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात समीरची पत्नी वैशाली जागीच ठार झाली. या घटनेनंतर संतप्त अवस्थेतील समीर याने स्वतःही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही बाब नागरिकांना समजताच, त्यांनी समीरला तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याची परिस्थीती गंभीर आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम