….म्हणजे राज्यपालांची वक्तव्य भाजपच्या नेत्यांना आवडतात? राष्ट्रवादीच्या ‘या’आमदाराचा भाजपवर निशाणा

Published on -

Maharashtra News:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यात सर्वच स्तरातून त्यांचा निषेध करण्यात येत आहे.

त्यात भाजप वगळता अन्य सर्व पक्षीय राजकीय मंडळी सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधला आहे. सध्या राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांकडून थोर व्यक्तीबद्दल वादग्रस्त अथवा काहीही बोलले तरी चालते.

त्यांच्याबद्दल भाजपचे नेते काहीच का बोलत नाहीत. भाजपचे अनेक नेतेमंडळी दिल्लीत बसून काहीही उलटसुलट विधाने करतात, आणि भाजपचे नेते त्याला विरोध का करत नाहीत. याचा अर्थ राज्यातील भाजप नेत्यांना त्यांनी केलेली वादग्रस्त विधाने आवडतात? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe