Maharashtra news : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेने काही पॅकबंद खाद्य वस्तूंवर जीएसटी आकारण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे पॅकबंद दही, पनीर आणि मध तसेच मांस, मासे महाग होणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक सुरु आहे. पहिल्या दिवशी फ्रोजन खाद्यपदार्थांवरील कर सवलत रद्द करून त्यावर कर लावावा अशी शिफारस अनेक राज्यांनी केली.

त्यानुसार हा प्रस्ताव परिषदेने मान्य केला आहे.पॅकबंद मासे, दही, पनीर, मध, फ्रोजन भाजीपाला, लोणी, गहू, आटा, गुळ, कुरमुरे, सेंद्रीय खत,कंपोस्ट यावर आता ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.