Pune Crime News : पत्नीची क्रौमार्य चाचणी घेऊन तिच्यासोबत केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- पत्नीची क्रौमार्य चाचणी घेऊन तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.

मुलगी झाल्याने माहेरी पाठविल्यानंतर राहते घर बदलून तिचे फोन देखील उचलण्यात आले नाही. (Pune Crime News

याप्रकरणी २५ वर्षीय विवाहितेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पती तसेच सासू-सासऱ्यांसह इतरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर तरूणी पती व त्याच्या कुटुंबासोबत राहत होती. मात्र, विवाहानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची क्रौमार्य चाचणी केली गेली.

तसेच, मुलगी झाल्याने तिला घरातील सर्व कामे करण्यास सांगत उपाशी ठेवण्यात येत होते. पती मद्यपान करून आल्यानंतर शिवीगाळ करून मारहाण करत असे.

दरम्यान, तिला माहेरी पाठविण्यात आले. त्यादरम्यान पती व त्याच्या कुटुंबाने राहत असलेले घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले.

घेऊन जाण्यास पती येत नसल्याने विवाहिता स्वत: परत आल्या असता त्यांना राहते घर बदलल्याचे समजले. तिच्या कुटुंबाने फोन केल्यानंतर त्यांचे फोन न उचलता मानसिक व शारिरीक छळ करून फसवणूक केली. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.