Maharashtra news : कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है. आमचे नेते पन्नास वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत.
त्यापैकी अर्धी वर्ष ते विरोधात होते, तर अर्धी वर्ष सत्तेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीशी संबंधित अपक्ष आमदारांची मतं महाविकास आघाडीला का मिळाली नाहीत, यावर चर्चा करणार आहोत. या निवडणुकीत ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का, हा देखील प्रश्न आहे, असेही त्या म्हणाल्या.