अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- एसटी संपाबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारसह याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडली.(Ahmednagar news)
आता एसटी कर्माचारी विलीनीकरणाबाबतची सुनावणी बुधवार २२ डिसेंबर राेजी पुढील हाेईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
वकील सदावर्ते म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आम्ही आज सांगितलं की, परिवनहनमंत्री हे वारंवार अल्टिमेटम दिल्यासारखं बोलतात.
५४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कर्मचारी नैराश्यात आहेत, ते काम करू शकत नाहीत. तसेच, आज सरकारचा आमचा आणि ज्या संघटना होत्या त्यांचा युक्तीवाद झाला.
आज आम्ही न्यायालायासमोर ४८ हजार कष्टकऱ्यांचं लिखित प्रतिज्ञापत्र करून ते सादर केलं. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर आता २२ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता यावर सुनावणी होणार आहे. अशी माहिती देखील सदावर्ते यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम