ST : सरकार बदलले मात्र परिस्थिती तीच 10 तारीख उलटली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही…

Ahmednagarlive24 office
Published:

ST : गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस काम बंद ठेवून संप केला. आताच्या सरकारने देखील तेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता. आता त्यांचे सरकार आले आहे. मात्र परिस्थिती तीच आहे. या महिन्यातही 10 तारीख उलटून गेल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

पगार उशिराने होण्यासाठी अर्थ खात्यातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाने मागील सहा महिन्यांच्या वेतन रकमेतील थकीत रकमेसह या महिन्याच्या वेतनासाठी 1000 कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारच्या अर्थ खात्याकडे केली होती.

असे असताना या महिन्याची 10 तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे सरकारच्यावतीने संप काळात न्यायालयात मान्य करण्यात आले होते.

तसेच एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार वर्षे सरकारच्या बजेटमध्ये तरतुद केली जाईल. असेही सांगण्यात आले होते. यामुळे ठाकरे सरकारच्या काळात वेळेवर वेतन मिळाले पाहिजे. सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे, अशी मागणी भाजपकडून केली जात होती.

एसटीचे शासनात विलीनीकरण झाले पाहिजे अशी चिथावणीखोर वक्तव्य करणारी मंडळी आहे कुठे आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे. यामुळे मात्र कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe