Maharashtra News : ऍड. गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. आता त्यांच्या यवतमाळ शहरातील टिंबर भवन येथील विदर्भाचा बुलंद आवाज या सभेत जोरदार राडा झाल्याचे वृत्त आले आहे. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे या मुद्द्यावरून सभा जमलेली होती.
यात एका गटाने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ कधी होणार याबाबत विचारणा करत विविध मागण्या केल्या. त्यानंतर सदावर्ते चांगलेच भडकले. त्यांनी अर्वाच्च भाषेत या लोकांना धक्के मारून बाहेर काढा असे फर्मान सोडले. या सभेमध्ये एसटी कर्मचारी आले होते.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-09-29T181443.017.jpg)
एसटीच्या संदर्भातल्या विषयांवर बोलण्याची मागणी एक गट करत होता. त्यावेळी आपले विषय मांडण्यापूर्वी माहिती द्यायची, त्याला वेळ दिली जाते. हे शरद पवारांचे दुकान नाही असा घणाघात गुणरत्ने यांनी केला. तसेच संदीप शिंदे सारख्या बांधलेल्या आणि पाळलेल्या कुत्र्याचे हे दुकान नाही. धक्के मारून बाहेर काढा त्याला.
त्याला शिस्त काय असते ते समजायला हवे. संदीप शिंदेंच्या कुत्र्याला ढकलून बाहेर काढा, असे अर्वाच्य भाषेत व्यासपीठावरून सुनावले. त्यामुळे हे वातावरण आणखीनच चिघळले. सभेमधून एका गटाला बाहेर काढण्यात आले. या पुस्तकावर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तैलचित्र आहेत.
शरद पवारांना धडा शिकवला. हाच धडा विरोधी संदीप शिंदे यांना शिकवला जाणार आहे. हिंदु राष्ट्रात प्रभू रामाच्या विचारांमध्ये कोणताही बदल होणार नाही असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी विरोधकांना दिला. जनसंघाचा केवळ दोन संघटनांवर विश्वास आहे. एक म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा संघ आणि दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे सदावर्ते यांनी यावेळी सांगितले.