इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय आहारात मिळणार अंडी, शाकाहारींना केळीचे नियोजन !

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News : राज्यात विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच पौष्टिक आहार देण्याचे नियोजनही शासनाने केले आहे. आता विद्यार्थ्यांना प्रथिनेयुक्त, तसेच उष्मांक असलेला

आहार देण्यासाठी इयत्ता पहिली ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनात अंडी दिली जणार आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान मध्यंतरी काही संघटना आक्रमक झाल्या होत्या. अंडी देऊ नये असा अट्टाहास त्यांनी धरला होता. त्यामुळे आता शाकाहारी विद्यार्थ्यांना आता केळी दिली जाणार आहे.

* कसे आहे ‘आर्थिक’ नियोजन

नगर जिल्ह्यातील ४ लाख ५७ हजार १९२ विद्यार्थी आहेत. प्रति विद्यार्थी पाच रुपयांप्रमाणे आठवड्यातील एक दिवसप्रमाणे २२ लाख ८५ हजार रुपये खर्च होईल. पहिली ते पाचवीपर्यंत २ लाख ७३ हजार १५६,

तर सहावी ते आठवीपर्यंत १ लाख ८४ हजार ३६ विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात ४५४६ एकूण शाळा असून ४ लाख ५७ हजार १९२ विद्यार्थी आहेत. या सर्वाना याचा लाभ होणार आहे.

* भरारी पथक ठेवणार लक्ष

अंडी किंवा फळांचा शाळा स्तरावर नियमित आहार दिला जावा, तसेच यात कोणतीही चूक होऊ नये यासाठी तालुकास्तरीय भरारी पथक नेमले आहेत. या पथकांनी अंमलबजावणीची खात्री करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.

* बुधवारी किंवा शुक्रवारी मिळणार आहार

शाळा व्यवस्थापन समितीमार्फत, तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरवणाऱ्या यंत्रणेकडून हा उपक्रम राबवला जाईल, संबंधित समिती अंडी खरेदी करून आठवड्यातील बुधवारी किंवा शुक्रवारी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे किंवा इतर पाककृतीचा आहार देणार आहे.

* जैन , वारकरी संघटना आक्रमक

मध्यान्न भोजनात अंडी समाविष्ठ केल्यानंतर जैन संघटना , वारकरी समाज आक्रमक झाला होता. राज्य शासनाने अध्यादेश काढून शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी, अंडी पुलाव देण्याचा निर्णय जो घेतला तो अंडीउत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला असून,

जैन समाज, वारकरी संप्रदाय, तसेच शाकाहारी नागरिकांच्या भावनांना याने ठेच पोहोचली आहे. पूर्ण शाकाहारी असलेल्या नागरिकांची भावी पिढी मांसाहारी बनविण्याचे शासनाचे षडयंत्र असल्याचा घणाघात या संघटनांनी केला होता. दरम्यान शासनाने शाकाहारी मुलांसाठी केळी देण्याचे नियोजन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe