मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्याला १२ प्रकारच्या पाककृती मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्याथ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पोषण योजनेंतर्गत शक्ती निर्माण पोषण आहार देण्यात येतो.
इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्याथ्यांना ४५० उष्मांक १२ ग्रॅम प्रथिनयुक्त तसेच ६ वी ते ८ वीपर्यंतच्या विद्याथ्यांना ७०० उष्मांक २० ग्रे ग्रॅम प्रथिनयुक्त आहार देण्यात येतो. सन २०११ मध्ये केलेल्या सुधारणानुसार, तांदळापासून बनवलेल्या
आहारापासून पोषण आहाराचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत होता. तांदळापासून बनवलेल्या आहारात सुधारणा करण्याचा विचार योजना चालवणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या डोक्यात होता. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी प्रयत्न करून पोषणआहार तीन संरचित आहार पद्धतीनुसार (संपूर्ण आहार) विद्यार्थ्यांना देण्याचा यंत्रणेचा मानस होता. त्यानुसार तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेली कडधान्ये (स्प्राऊट्स) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर आणि नाचणी सत्त्व याचा विचार करून नवीन पाककृती देण्याचा निर्णय जून २०२४ मध्ये झाला
१२ पाककृती व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, मूग शेवगा आणि वरण भात, अंडा पुलाव, गोड खिचडी नाचणी सत्त्व
सगळीकडे समावेशक आहार पद्धती असावी, त्यासाठी लोकप्रतिनिधी, केंद्रीय स्वयंपाकगृहे, बचत गट, आचारी आदी संघटनांची निवेदने प्राप्त झाल्यावर सरकारने समिती नेमून १२ प्रकारच्या पाककृती निश्चित केल्या