Supriya sule : सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला.
असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत तुपकरांना फोन करून पाठिंबा दर्शवला. दरम्यान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुपकर बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन आंदोलन केले.
यावेळी त्यांनी पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेऊन त्यांच्या दिडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर परिस्थिती काहीशी निवाळलेली होती.
असे असताना मात्र आता पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्याने याठिकाणी पुन्हा कार्यकर्ते जमले आहेत. तुपकरांनी 10 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 11 फेब्रुवारीला शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
ते चार दिवसापासून गायब होते. गेल्या मंगळवारी त्यांनी शेतकरी प्रश्नासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला होता. यामुळे आता याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.