अनेक व्यक्तींच्या समर्पित सेवेमुळे प्रवरा परीसरात विकासाची मंदीरे – राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : अनेक व्यक्तींच्या समर्पित सेवेमुळे प्रवरा परीसरात विकासाची मंदीर उभी राहिली. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीने साकार झालेला विकास प्रत्येकासाठी वैभव ठरले असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा अभिमत विद्यापीठाचा २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वाटचालीत योगदान देणारे डॉ. नानासाहेब म्हस्के पाटील, माजी प्राचार्य डॉ.के.राजू यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेच्या वाटचालीत योगदान देणारे अधिकारी कर्मचारी तसेच संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य सागर वैद्य, डॉ. संदीप पालवे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एन.मगरे, विश्वस्त सुवर्णा विखे, डॉ. भास्कराराव खर्डे, कैलास तांबे, एम. एम. पुलाटे, ध्रुव विखे पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. म्हस्के आणि डॉ. के. राजू यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले, खासदार साहेबांनी ग्रामीण रुग्णालय सुरू केले, तेव्हा अनेकांनी शंका उपस्थित केल्या.

पण या रुग्णालयाकरीता त्यांनी अशी माणसं शोधून आणली की, या व्यक्तींच्या अपार कष्टाने रूग्णालयाचा नावलौकीक वाढला. पायाचा दगड बनलेल्या आशा व्यक्तिमुळे ही विकासाची मंदीर उभी राहीली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना वैद्य यांनी प्रवरा परिसराचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासात भर घालणार असल्याचे सांगत नवीन शिक्षण धोरण राबवण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन केले.

कुलपती डॉ. विखे पाटील यांनी संस्थेची प्रगती ही शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांच्या कार्यावर अवलंबून आहे. आपल्या कार्यामुळे प्रवरा मेडिकल ट्रस्ट नव्या उंचीवर जात आहे. ना. विखेंच्या सहकार्याबद्दल त्यांनी यावेळी आभार मानले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. व्ही.एम मगरे यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. अरुणकुमार व्यास यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe