मध्य रेल्वेच्या नांदगाव-मनमाड तिसऱ्या रेल्वे लाइनची चाचणी

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : मध्य रेल्वेने भुसावळ-मनमाड विभागादरम्यान नवीन तिसरा मार्ग बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी भुसावळ ते पाचोरा विभागादरम्यान नवीन तिसऱ्या लाइनचे बांधकाम पूर्ण झाले आहे; तर पाचोरा ते मनमाड विभागादरम्यान उर्वरित तिसऱ्या लाइनचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

त्याचा एक भाग म्हणून गुरुवारी (दि. २४) भुसावळ विभागात मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी रेल्वे लाइन प्रकल्पाच्या चालू असलेल्या नांदगाव-मनमाड सेक्शनमधे तिसऱ्या लाइनची पाहणी करून चाचणी केली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नांदगाव ते मनमाड स्थानकांदरम्यान विशेष गाडीची १३० किमी प्रतितास वेगाने चाचणी घेण्यात आली.

मध्य रेल्वेने भुसावळ-मनमाड तिसऱ्या मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पासह मनमाड-नांदगाव विभागाच्या २५ किमी नवीन तिसऱ्या लाइनची यशस्वीरीत्या चाचणी केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांनी

विद्युतीकरण प्रकल्पासाठी प्रस्तावित एकूण १८३.९४ किमीपैकी ९६.८१ किमीची पूर्तता झाली आहे. या बांधकामासाठी एकूण ४७ पुलांची स्थापना करणे आवश्यक असून, ज्यामध्ये सहा मोठे आणि ४१ लहान पूल आहेत.

या विभागात मनमाड जंक्शन, पानेवाडी, हिसवळ, पांझण आणि नांदगावसह धोरणात्मकदृष्ट्या स्थित स्थानके आहेत. मनमाड- नांदगाव लाइन सुरक्षा तपासणी, वेग चाचणी आणि कार्यान्वित समारंभास विभागीय रेल्वे व्यवस्थापक भुसावळ विभाग इती पांडे, मुख्य अभियंता एस. के. झा, उपमुख्य अभियंता किशोर सिंह यांसह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पानेवाडी येथे रेल्वे लाइनलगत मंडप उभारून नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe