अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात उभ्या पिकांना जीवदान तर देता आले नाहीच; दुसरीकडे काढून ठेवलेली पिकेही हातची गेली आहेत.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात अतिवृष्टीने लाल कांद्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेले तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे व महसूल विभागाच्या अधिकार्यांपुढे शेतकर्यांनी डोळे पाणावत आपल्या व्यथा मांडल्या.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अनेक गावांमध्ये लाल कांद्याचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. दरम्यान यंदाच्या वर्षी परतीच्या पावसामुळे लाल कांदा, मका, ऊस, डाळिंब इत्यादी पिकांची अक्षरशः वाट लागली आहे.
तर कांदा शेतातच सडून गेला आहे. या अतिवृष्टीने सुमारे एक लाख रुपयांच्या आसपास खर्च करुनही शेतकर्यांच्या पदरी काहीच उरले नाही.
हातातोंडाशी आलेला घास या संकटामध्ये हिरावून गेला आहे. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, कृषी मंडल अधिकारी पंढरीनाथ लेंडे,
तलाठी के.बी.शिरोळे, कृषी सहाय्यक प्रदीप मंडलिक यांनी नांदूर येथील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत पंचनामे केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













