उन्हाची काहिली, केंद्र सरकार म्हणते काळजी घ्या, दिला हा सल्ला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Weather News :- गेल्या काही काळापासून देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट आली आहे. आणखी काही दिवस ती कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. तसेच नागरिकांनाही काळजी घेण्यासाठी काही टीप्स देण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेसे पिण्याचे पाणी, आवश्यक औषधे आणि उपकरणांची पुरेशी उपलब्धता व सज्जता ठेवण्यास सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यात उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखड्याचा सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रसार करण्याचे आवाहन केले.

‘आवश्यक औषधे, आयव्ही फ्लुइड्स, बर्फाची पाकिटे, ओआरएस आणि इतर सर्व आवश्यक उपकरणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी आरोग्य सुविधेच्या सज्जतेचा आढावा घेतला पाहिजे.

सर्व आरोग्य सुविधांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता आणि गंभीर भागात गारवा देणाऱ्या उपकरणांचे कार्य निरंतर सुरू असल्याची खात्री केली जावी,’ असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

हे टाळा

– नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये

– विशेषत: दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळावे
– चहा, कॉफी किंवा मोठ्या प्रमाणात मद्यपान टाळा किंवा साखर मिसळलेले पेय टाळा

– उच्च प्रथिनेयुक्त अन्न, तसेच शिळे अन्न टाळा

– पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडून जाऊ नका

हे करा

– नागरिकांनी अधिकाधिक पाणी प्यावे
आपले शरीर शक्यतो संपूर्ण झाकून घ्यावे

– शक्य तितके घरात राहावे

– कामगारांना कामाच्या ठिकाणी थंड पिण्याचे पाणी दिले जावे

– कामगारांनी थेट सूर्यप्रकाश जाताना सावधगिरी बाळगावी
– कामगारांसाठी कामाची जागा सावलीत उपलब्ध करून द्यावी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe